'सूरज इस्टेट'लवकरच बाजारात मुंबई : मध्य मुंबईतील अनेक पुनर्विकास प्रकल्प हाती घेतलेल्या सूरज इस्टेट डेहलपर्सचा आयपीओ १८ ते २० डिसेंबरदरम्यान बाजारात येत आहे. या हृशूसाठी ३४० ते ३६० रुपये किंमतपट्टा ठेवण्यात आला असून हा इशू ४०० कोटी रुपयांचा आहे. यात किमान ४१ होअरसाठी व त्यापुढे ४१च्या पटीत होअरसाठी अर्ज करावा लागेल. या इशूमधील ५० टक्के शेअर संस्थात्मक गुंतवणूकदारांना, पस्तीस टक्के शेअर किरकोळ गुंतवणूकदारांना व १५ टक्के शेअर बड्या वैयक्तिक बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना दिले जातील. कंपनीने आतापर्यंत ७४२ प्रकल्प पूर्ण केले असून त्यांचे सोळा प्रकल्प सुरू आहेत. कंपनीचे काम ३६ वर्षे सुरू असून त्यांनी आतापर्यंत सारस्वत बँक, युनियन बँक, एनएससी यांना इमारती बांधून दिल्या आहेत. कंपनीतर्फे व्हॅल्यू लक्झरी गटात एक व दोन बीएचके, लक्झरी गटात दोन ते चार बीएचके आणि अन्य व्यापारी बांधकामे केली जातात. दक्षिण मध्य मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांपैकी आठ टक्के बाजार वाटा कंपनीचा आहे.