A year before the 'IPO' market again buzzed

Saturday 16th December, 2023

Article Details
  • View Image
  • View PDF
  • View Text

वर्षसांगतेपूर्वी आयपीओ' बाजारात पुन्हा गजबज येत्या आठवड्यात ७ कंपन्यांकडून ५,३०० कोटींची निधी उभारणी लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी मुंबई : देशांतर्गत तसेच बाहेरील अनुकूल घटनाक्रमाने भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर पोहोचले असताना, २०२३ साल मावळण्यापूर्वी प्राथमिक बाजारात अनेक नवीन कंपन्यांची ‹ आयपी ओ ' प्रस्तावांसह गजबजही वाढली आहे. बाजार तेजीने उत्साह संचारलेल्या गुंतवणूकदारांकडून पुढील आठवड्यात १८ ते २२ डिसेंबरदरम्यान सात कंपन्या साधारण ५,३०० कोटींचा निधी उभारू पाहत आहेत, तर चार कंपन्यांच्या समभाग या आठवड्यात बाजारात सूचिबद्ध होतील. ह्य आयनॉक्स इंडिया अपारंपरिक ऊर्जा स्रोत व इंधनांसाठी आवश्यक क्रायोजेनिक टाक्या आणि उपकरणांची उत्पादक आयनॉक्स इंडिया या बडोदेस्थित कंपनीची १,४५९.३२ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहणारी भागविक्रो १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान खुली आहे. प्रत्येकी ६२७-६६० रुपये किमतीला कंपनीच्या समभागांशी बोली लावता येईल. भागविक्रीच्या पहिल्या दिवशीच कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या समभागांच्या तुलनेत पावणेतीनपट अधिक मागणी नोंदवणारे अर्ज मिळविले. ह हॅपी फोर्जिंग लुधियानास्थित वाणिज्य वापराच्या वाहनांसाठी क्रॅमशाफ्ट आणि अन्य महत्त्वाच्या सामग्रींच्या निर्मात्या आणि जागतिक ओईएम पुरवठादार असलेल्या हॅपी फोर्जिंग लिमिटेडने १९ ते २१ डिसेंबर या दरम्यान प्रारंभिक भागविक्रीतून १,००८ कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने प्रति समभाग ८०८ रुपये ते ८५० रुपये असा किंमतपट्टा निर्धारित केला आहे. ह क्रेडो ब्रॅण्डूस मार्केटिंग मुफ्ती जीन्स आणि त्याच नाममुद्रेने पुरुष परिधानांची निर्मिती करणाऱ्या क्रेडो ब्रॅण्ड्स मार्केटिंग लिमिटेड ही मुंबईस्थित कंपनी १९ ते २१ डिसेंबरदरम्यान आयपी ओसह बाजारात उतरत आहे. प्रति समभाग २६६ ते २८० रुपये किंमत पट्ट्याने होणाऱ्या या भागविक्रीतून कंपनीला ५५० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे. छ मुत्थूट मायक्रोफिन मुत्थूट पाप्पाचन समूहाचा अंग असलेली देशातील पाचव्या क्रमांकाची लघु वित्त क्षेत्रातील कंपनी मुत्थूट मायक्रोफिन तिच्या आयपी ओसाठी गुंतवणूकदारांना १८ ते २० डिसेंबरदरम्यान अजमावेल. कंपनी या माध्यमातून ९६० कोटी रुपये उभारू पाहत असून, त्यासाठी २७७ ते २९१ रुपये प्रति समभाग किंमतपट्टा तिने निर्धारित केला आहे. ह सूरज इस्टेट डेव्हलपर्स विशेषतः दक्षिण-मध्य मुंबईत निवासी तसेच वाणिज्य मालमत्तांच्या विकसनांत अग्रेसर सूरज इस्टेट डेव्हलपर्स ही कंपनी १८ ते २० डिसेंबरदरम्यान सुरू राहणाऱ्या प्रारंभिक भागविक्रीतून ४०० कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रति समभाग ३४० ते ३६० रुपये किंमतपट्टा निर्धारित केला आहे ह मोतीसन्स ज्वेलर्स जयपूरस्थित सराफ पेढी मोतीसन्स ज्वेलर्स १८ ते २० डिसेंबर या दरम्यान सुरू राहणाऱ्या भागविक्रीतून १५१ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने प्रति समभाग ५२ ते ५५ रुपये किंमतपट्टा निर्धारित केला आहे.