एकाने केले मालामाल; डे तिघांनी दिला झटका मुंबई : शेअर बाजारात मंगळवारी चार कंपन्यांचे आयपीओ खुले झाले. यापैकी एका कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. मात्र, तीन शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगलाच फटका दिला. मोतिसन्स ज्वेलर्सच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना बंपर नफा दिला. तर मुथ्थूट मायक्रोफिन, सूरज इस्टेट डेव्हलपर्स आणि सहारा मेरिटाइम लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे नुकसान केले. मुथूट ग्रुपच्या मायक्रो-फायनान्स युनिट मुथूट मायक्रोफिनचे शेअर्स मंगळवारी पाच टक्क्यांच्या घसरणीसह सूचीबद्ध झाले. आयपीओ खुला होण्याआधी त्याची मूळ किंमत २९१ रुपये होती. मुंबई शेअर बाजारात आयपीओ किमतीपेक्षा ४.४६ टक्क्यांनी खाली येऊन २७८ रुपयांवर उघडला. नंतर तो ८.८३ टक्क्यांनी घसरून २६५.३० रुपयांवर आला. कंपनीचा मोतिसन्सचे गुंतवणूकदार मालामाल जयपूरस्थित कंपनी मोतिसन्स ज्वेलर्सचे शेअर मंगळवारी शेअर बाजारात सूचिबद्ध झाले . शेअर्स ५५ रुपयांच्या मूळ किमतीवरून ९८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. मुंबई शेअर बाजारात हा शेअर १०३ .९० रुपयांवर सूचीबद्ध झाला . नंतर तो १०९.०९ रुपयांवर पोहोचला . राष्ट्रीय शेअर बाजारात हा शेअर १०९ रुपयांवर सूचिबद्ध झाला . सुरुवातीला कंपनीचे बाजारमूल्य ९९४.३० कोटी रुपये होते. मोतिसन्स ज्वेलर्सच्या १५१ कोटी रुपयांच्या आयपीओला १५९ .६१ पट बोली मिळाली . ५२ ते ५५ रुपये प्रति शेअर किमतीसह २ कोटी ७४ लाख रुपयांचे शेअर्स जारी करण्यात आले. शेअर राष्ट्रीय शेअर बाजारात ५.३९ रुपयांवर सूचीबद्ध झाला. टक्क्यांनी घसरून २७५.३० आयपी ओसाठी किंमत २७७ ते २९१ रुपये अशी प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. सूरज इस्टेट डेव्हलपर्सच्या शेअर्सची आयपीओ किंमत ३६० रुपये होती. मंगळवारी बाजारात आयपीओ खुला झाल्यावर शेअर्स सहा टक्क्यांनी घसरला. बीएसईवर शेअर्स ४.५ टक्क्यांनी घसरून ३४३.८० रुपयांवर उघडला. नंतर शेअर्स १० टक्क्यांनी घसरून ३२३.९५ रुपयांवर आले. एनएसईवर शेअर्स ५.८८ टक्क्यांनी घसरून ३४० रुपयांवर सूचिबद्ध झाला. सहारा मेरीटाईमचा शेअर बाजारात खुला झाला तेव्हा त्याचे दर स्थिर होते. पण, नंतर त्यात घसरण झाली. या आयपीओची किंमत ८१ रुपये प्रति शेअर होती. मंगळवारी सकाळी बीएसईमध्ये शेअर्स ८१ रुपयांवर खुला झाला. मात्र, काही वेळानंतर तो ४.२६ टक्क्यांनी घसरून ७७.५० रुपयांवर आला.