'प्रॅक्टस'चे मूल्यांकन एक अब्ज डॉलरवर कंपनीचे २०३० पर्यंतचे ध्येय मुंबई, ता. २ : तोट्यात किंवा यथातथा चालत असलेला एखाद्या कंपनीचा व्यवसाय कसा वाढवावा, कंपनी नफ्यात कशी आणावी, खर्च कसे कमी करावेत, याचा सल्ला देणाऱ्या कन्सल्टिंग फर्म प्रॅक््टसने २०३० पर्यंत आपले मूल्यांकन एक अब्ज डॉलर एवढे करण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीचे पार्टनर (परफॉर्मन्स इम्य्रुव्हमेंट) अमेय वायंगणकर यांनी ही माहिती 'सकाळ'ला दिली. प्रॅक््टसतर्फे औषध निर्मिती कंपन्या, ई-कॉमर्स कंपन्या, निर्मिती क्षेत्रातील कंपन्या, दळणवळण, रिटेलिंग आदी कंपन्यांना व्यवसायवाढीचा सल्ला दिला जातो. भ्रॅक््टस'तर्फे परदेशातील कंपन्यांनाही सल्ला दिला जातो. त्यासाठी अमेरिकेतही त्यांचे ऑफिस आहे, तर आखाती देशातही त्यांचे क्लायंट आहेत. भारतात मुंबई, बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद, बडोदा, हैदराबाद आदी शहरात प्रॅक््टसची कामे असतात. त्याचा आराखडा केला जातो. या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या, छोट्या कंपन्या आणि मध्यम कंपन्या यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. अमेय वायंगणकर, परफॉर्मन्स इम्मुव्हमेंट उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादनात वाढ कशी करावी, तंत्रज्ञान किंवा डिजिटल क्षेत्रातील कंपनीला पाच वर्षांत विकास कसा होईल, दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर उद्दिष्ट साध्य कसे करावे, ग्राहक वाढले का, कार्यचालन खर्च कमी झाले का, शंभर दिवसांनी कोणते उद्दिष्ट साध्य व्हावे, यातील कायदेशीर व आर्थिक मुद्दे, एचआर, माकेंटिंग, उत्पादन, पुरवठा साखळी, रिसर्च आणि डेव्हलपमेंट आदी सर्व बाबी तपासून त्याचे आराखडे सांगून त्यावर अंमलबजावणी करतो, असेही वायंगणकर यांनी सांगितले.